श्री एकलिंग तेली

त्यानंतर भ्रमण करता करता श्रीनागनाथ मानूर नगरीशेजारील नागतळे येथे येऊन पोहोचले, ही मानूर नगरी सध्या बीड जिल्ह्यामध्ये पाथर्डी पासून जवळ आहे. मानूर येथील नागतळी मुक्काम करताच आपल्या सद्गुरूच्या दर्शनाच्या ओढीने व्याकुळ झालेले श्रीहेग्रसयांनी मागे वळून पाहिले, व त्यांनी आपल्या सद्गुरूंचे दर्शन घेतले त्यावेळी श्री नागनाथांनी भक्त हेग्रसांना अट मोडल्याचे जाणवून दिले, व सांगितले की, ‘ मी पुढे येणार नाही ‘ त्यावेळी भक्त हेग्रसांनी आपण आपला देह त्यांच्या चरणावर अर्पण करण्याची तयारीही दर्शविली. शेवटी कनवाळू अशा श्रीनागनाथांनी ‘तू पुढे जाऊन संसार कर मी योग्य वेळी तुझ्या गावी येईन त्यावेळी तू मला ओळख ‘ असे सांगून भक्त हेग्रसांना त्यांच्या स्वग्रामी म्हणजे चंद्रमौळी (मोहोळ) येथे पाठविले.गुरूआज्ञेप्रमाणे भक्त हेग्रसांनी मोहोळ येथे येऊन संसार केला. येथे एकलिंग तेली नावाचा एक सद्विचारी व सात्विक मनोवृत्तीचा मनुष्य रहातहोता.रानामध्ये महान साधु आलेले आहेत असे कळल्यावर श्री तेली श्रीनागनाथांच्या दर्शनाला गेले. त्यांच्या दर्शनाने आपणाला फार मोठा अध्यात्मिक लाभ होणर अशी एकलिंग तेली यांच्या मनाची खात्री झाली व आपले गतजन्मांचे पुण्य असल्याखेरीज अध्यात्मिक क्षेत्रातील अतिशय प्रगत व्यक्तींची गाठ होत नसते असे तो तेली मानत असे. दिवसानुदिवस त्यांच्या दर्शनाला जाऊन त्याचे मन तर आनंदीत झालेच पण त्याला दिव्य अनुभव सुद्धा येऊ लागले त्याने स्वत:च्या इच्छेने श्रीनागनाथांचे शिष्यत्व स्विकारल्यावर त्याला नाना त-हेच्या सिद्धी प्राप्त झाल्या.
दिवा निशी तो नम्र सेवा करी।लाभल्या तयास सिद्धी भारी ।
कृपा करी नागनाथ कैवारी। धन्य पुण्यवान तो एकलिंग ॥