मोहोळ

1. श्रीनागनाथ मंदिर
हे गाव सोलापूर-पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून सुमारे 20 मैल (30 कि.मी.) अंतरावरआहे. ह्यागावातअत्यंतसुंदरकोरीव असे श्रीनागनाथांचे दगडीमंदिर आहे. यातील श्रींचे स्थान स्वयंभू आहे. मंदिरातच मोठा असा दगडी नंदीआहे..

2) श्रीउत्तरेश्वरमंदिर (विमानटेकडी) :-
श्रीउत्तरेश्वरमंदिर (मठ) हे पूर्वी हेग्रसांचे निवासस्थान होय. येथे श्रीनागनाथ हेग्रसां समवेत काही काळ वास्तव्यास होते. ते वास्तव्यास असताना, हेग्रसांना ग्रामस्थ व ब्राम्हणांनी वाळीत टाकल्यामुळे अक्षयतृतीये दिवशी पितरांचे श्राध्दकर्म करण्यास कोणीही ब्राम्हण त्यांच्या घरी येण्यास तयार नव्हते. त्यामुळे उद्विग्न व खिन्न मनाने ते बसले असता त्या अवस्थेत पाहून श्रीनागनाथांनी कारणविचारले असता त्यांनी घडलेला वृत्तांत सांगितला.
श्री नागेशांनी श्राध्दकर्माची पूर्ण तयारी करावयास हेग्रसांना व त्यांच्या पुत्रास सांगितले व तयारी पूर्ण झालीअसता श्री नागनाथांनी इंद्र देवास आज्ञा करुन या गावातील सर्व पितर खाली बोलावले. व ते येतानाआपापल्या विमानातून (स्वर्गातून खाली येण्यासाठीअसलेले साधन) हेग्रसांच्या वाड्यात उतरवले व त्यांनी विधीवत श्राध्दकर्म केले. असा अलौकिक चमत्कार श्रीनागेशांनी केला.
पुढे विमान येथे उतरल्याने याठिकाणास ‘ विमानटेकडी ‘ असेही म्हणतात. हे ठिकाण गावाच्या उत्तरेस सोलापूर-पूणेहायवेलगत पहावयास मिळते.

3) खिचडापार :-
हे स्थान मंदिरा शेजारी आहे. याठिकाणी 3-4 फुटी उंचीचा दगडी नागफणा असून उत्सवाच्या वेळी या ठिकाणी अन्नधान्याची भाकणूक खिचड्याद्वारे सांगितली जाते.

4) खर्गतीर्थ :-
श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम दिशेला ओढ्या लगत खर्गतीर्थ (खर्गडोह) आहे. त्याच्या मध्यभागीब िंडा (चौकोनीदगडीकट्टा) आहे. श्री नागेश वचना प्रमाणे, श्रीनागेश म्हणाले की, ‘ मी येथून पुढे जोपर्यंत चंद्र, सुर्य, पृथ्वीतलावर तळपतील, तो पर्यंत वायुरूपाने येथे येत जाईन व भक्त हेग्रसाला व पुढे त्यांच्या वंशाला भेट देईन.’ खर्ग डोहात बसण्यासाठी लोकांनी नंतर वावज्या बांधल्या. अतिशय सुंदर व भव्य असे त्यावेळी खर्ग तीर्थ निर्माण केले गेले. या दोन्ही दिवशी अक्षयतृतीयेच्या रात्री च्या कार्यक्रमाला खर्ग म्हटले आहे आणि सप्तमीच्या कार्यक्रमाला गण म्हटलेआहे.
खर्गतीर्थात आल्यावर पावसा संबंधी भविष्य वर्तवून आपल्या भक्तास पूर्वी दिलेल्या वरानुसार बिंडयावर उभा राहून त्यास भेट देतात. हा भेटीचा सोहळा अत्यंत पाहण्यासारखा असतो. ह्या वेळी भक्त लोक भजन म्हणतात.

5) वाळूतीलपेरणी:-
पुढे खर्गतीर्थातून बाहेर येउन पेरणीसंबंधी भविष्य वर्तवितात.

6) जगदंबादेवीमंदिर:-
श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम दिशेला ओढ्यालगत अतिशय सुंदर व भव्य असे जगदंबादेवी मंदिर आहे.

7) काकडेपार:-
हे ठिकाण भव्य अशा वेशी लगत असून या ठिकाणी गावाची सुखशांती व रोगराई विषयी भाकणूक केली जाते.

8) संकटहरणीकृपाधाम:-
हे ठिकाण भव्य अशा वेशीलगत आहे.

9) मशीद (हिंदूमुस्लीमऐक्य):-
वेशी लगतच शहरातील सर्वात जुनी व भव्य अशी मशीद असून उत्सवाच्यावेळेस श्रीनागनाथ स्वत:च्या उजव्या कानात बोटघालून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन सर्वांना घडवितात.

10) हेग्रससाकीस्थान :-
हे स्थान मशिदी शेजारी आहे. याठिकाणी 3-4 फुटी उंचीचा दगडी नागफणा असून उत्सवाच्यावेळी श्री हेग्रस वंशजाकडून येथे साकी म्हंटली जाते.

11) मुंगीचाधोंडा:-
वडवाळ येथे श्रीनागनाथांनी एक मोठा चमत्कार केला. सरकाळीचा (कडब्याचा) एक गाडा तयार केला. तो गाडा ओढण्यासाठी माकुडे (मुंगळे ) लावले. त्या अशा गाडयावर मोठमोठाले पाषाण लादले व तो गाडा मुंगळे ओढून आणू लागले. त्या ठिकाणाला मुंगीचा धोंडा म्हणून ओळखिले जाते.या घटनेचे प्रतिक म्हणून मोहोळ येथे एक मुंगीचा धोंडा स्थापनकरण्यातआला. हेस्थानमंदिराच्यानैऋत्यदिशेसआहे. येथेउत्सवाच्यावेळीजनावराच्याचाज्याचीभाकणूककेलीजाते.

12) श्रीभिकलिंगसमाधी:-
मोहोळ येथे श्रीनागनाथांच्या वास्तव्यात त्यांचा भक्त भिकाजी नावाचा माळ्याचा मुलगा होता.त्याचे वय साधारणपणे सात – आठ वर्षाचे होते.त्याला लहाणपणापासून शिवाचे वेड होते.म्हणून लंपडावादि खेळ खेळण्याबरोबर त्याला मातीचे शिवलिंग बनविण्याचा छंद जडला होता. म्हणून तो रोज सकाळी ओढ्याकाठी जावून मातीचे एक शिवलिंग तयार करीत असे व त्यावर उपलब्ध असलेली पुष्प अर्पण करीत असे आपल्या सवंगड्याबरोबरच आपल्या आईवडिलांनाही तो नमस्कार करण्यास सांगत असे. हा त्याचा छंद नित्य घडत असल्याने त्याच्या हातून रोज शिवाची जणू पार्थिव पूजाच घडत असे.गावातील इतर लोकांना त्याचा हा छंद माहित होता म्हणून शिंवलिंग बनविणारा भिकाजी म्हणून लोक त्याला “भिकलिंग” म्हणू लागले.एकदा ते लपंडावाचा खेळ खेळत होते. त्यावेळी लपण्याची वेळ त्या भिकलिंग ह्या मुलावर आली त्यावेळी त्याने श्रीनागनाथांना विचारले, ‘मीकुठे लपू?म्हणजे माझे मित्र मला हुडकू शकणार नाहीत.’त्याच्या बोलण्याचा भावार्थ लक्षात घेता श्रीनागनाथांनी त्याला वाळूत पुरून बसवले.’आता तुला तुझे मित्र हुडकू शकणार नाहीत’ असे सांगितले.त्याप्रमाणे तो अगदी निश्चिंतपणे त्यांचे स्मरण करीत वाळूत बसून राहिला.खेळ संपल्यावर श्रीनागनाथांनी भिकलिंगास वर येण्यास सांगितले त्यावेळी त्या महत् भाग्यवान भिकलिंगाने उत्तर दिले की, ‘ देवा तु मला येथे निश्चिंतपणे बसण्यास सांगितलेस. मी तुझी सेवा करीत बसलो आहे आता मला पुन: वर का बोलावता ?’ हे ऐकून श्रीनागनाथ संतोष पावले व त्यांनी त्यास वर दिला’मी उत्सवात वैशाख शुध्द षष्ठीस तुझ्या भेटीस निरंतर येईन.’ अशा प्रकारे श्री नागनाथांनी भिकलिंगाचा उध्दार केला.हा भेटीचा सोहळा आज पावेतो चालू आहे.धन्य तो भिकलिंग. या ठिकाणी अनेक संताच्या समाध्या आहेत. त्यामुळे या ठिकाणाला’ समाधीचामळा ‘ म्हणून ओळखले जाते.

13) नागचिंच :-
1. घाटणे रस्ता-
हे स्थळ श्रीनागनाथ मंदिरापासून उत्तरेस एक मैल अंतरावर आहे. गावा बाहेर याठिकाणी श्रीनागनाथ फकीर वेशात हेग्रसांना भेटले व त्यांनी एक त्रीतभोजन केले. या ठिकाणी चिंचेचे उंच व डेरेदार झाड असून आजतागायततेयाची साक्ष देते.

13) नागचिंच :-
2. जुना पारंपारिक वडवाळ रस्ता-
चैत्र महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थी च्या रात्री मोहोळ (चंद्रमौळी) सोडून श्रीनागनाथ गावाबाहेर आले. तेथून ते ‘ हे निंदक गांव आहे येथे राहणे नको म्हणून व दुसरीकडे राहू ‘ या साठी रात्रीच पळत निघाले. त्यांच्या बरोबर बराचसा शिष्य परिवार व हेग्रस हे ही निघाले. हे सर्वजण पळत आडरानातून निघाले. वाटेत एक चिंचेचे झाड होते. त्या खाली थोडसे थांबून मागे वळून पाहिले तर चंद्रमौळी गांव दिसत होते. ‘ गांव दिसते आहे तर अजून पुढे चला ‘ म्हणून पुढे पळत निघाले. रानात गेल्यावर मागे वळून पाहिले असता आता येथून गाव दिसत नाही तर येथे थांबू म्हणूनतेथेविसावले.

14) सोळासिध्द :-
नागसांप्रदायांची 16 सिद्धआणिनागेश सांप्रदायातील 16 सिद्धयांचेनांवेवेगळीआहेत. 1) संगमेश्वर 2) कल्लेश्वर 3) मुक्तेश्वर 4) गंगेश्वर 5) बलेश्वर 6) चंद्रशेखरेश्वर 7) चन्नेश्वर 8) परमेश्वर 9) मल्लेश्वर 10) मरळसिद्धेश्वर 11) उत्तरेश्वर 12) मुगळीमल्लेश्वर 13) सोमसिद्धेश्वर 14) गुप्तेश्वर 15) निम्बेश्वर 16) मुगळेश्वर ही नागेशसंप्रदायातील 16 सिद्धांचीनांवेआहेत. हे ठिकाण मंदिराच्या आग्नेय दिशेस आहे.

15) श्रीगवयीस्वामी :-
श्री गवयीस्वामी हे अक्कलकोट स्वामींच्या समकालीन एक सत्पुरुष होऊन गेले. यांचे बराच काळ मोहोळ येथे वास्तव्य होते व त्यांनी येथेच समाधी घेतली.हे स्थान मंदिराजवळ असून याची पुजा अर्चा परंपरेने श्री. वालेघराण्याकडे आहे.

15) वेस :-
श्री नागनाथ मंदिरा जवळच भव्य अशी वेस असून उत्सवा दम्यान या वेशीला महत्व आहे.
