मार्डी

सोलापूरपासून 15 मैल अंतरावर मार्डी हे तीर्थस्थान आहे.येथे श्रीनागनाथांचे मंदिर असून हे संप्रदायातील एक महत्वाचे ठिकाणआहे.

1. श्रीनागनाथमंदिर

मार्डी गावाच्या पश्चिम दिशेस श्रीनागनाथांचे भव्य असे पुरातन मंदिर आहे. श्री महाराजांनी भक्त बातकव्वा हिच्यासाठी मार्डी येथे येऊन तिला जंगम रुपात दर्शन दिले.

2 बातकव्वासमाधी

श्रीनागनाथ महाराजांनी वडवाळ / मानूर येथे बातकव्वा हिस सांगितल्या प्रमाणे मार्डी येथे जंगम रुपातून दर्शन दिले ते ठिकाण म्हणजे सद्याचे नागनाथ मंदिर होय. त्यावेळेस बातकव्वाने श्रीमहाराजांना वर मागितला की, ‘ आता माझ्या जन्माचे सार्थक झाले असून मी समाधी घेणार आहे तर प्रति वर्षी तुमचा संचार हा माझ्या मस्तका वर व्हावा.’ त्याप्रमाणे बातकव्वाने त्याच ठिकाणी संजीवनी(जिवंत) समाधी घेतली. हे ठिकाण नागनाथ मंदिराच्या आवारात पहावयास मिळते. श्रीनागनाथांनी दिलेल्या वरा प्रमाणे प्रति वर्षी अश्विन शुध्द नवमी व एकादशीस बातकव्वा यांच्या समाधीवर श्रींचा संचार होतो.ings.

3. कल्लोळ

कल्लोळ हे पवित्र तीर्थस्थान मंदिराच्या आवारात आहे. उत्सवाच्या वेळी संचाराच्या अगोदर स्नानासाठी म्हणून त्याचा उपयोग होतो.तसेच रोग निवारणार्थ इतर भक्तजनही त्यात श्रध्देने स्नान करतात.

4. महाव्दारभाकणूक

येथे उत्सवा दरम्यान श्रीमहाराजांकडून पेरणी व पावसा संदर्भात भाकणूक होते.

5. यमाईमंदिर

यमाई मंदिर हे श्रीनागनाथांच्या मंदिरापासून एकमैल अंतरावर आहे.तसेच हे मंदिर पुरातन असुन शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.याठिकाणी उत्सवात भाविक जन श्रध्देने दर्शनास जातात.

6. श्रीमार्कंडेयऋषीस्थान

गावाच्या पूर्व दिशेस दीड मैल अंतरावर एका तलावाच्या काठी पुरातन असे श्री मार्कंडेय ऋषींचे स्थान आहे.उत्सवाच्या वेळी म्हणजे अश्विनशुध्दनवमीस श्रीनागनाथ या स्थानावर भेट देण्यास जातात.

7. खिचडापार

उत्सवा दरम्यान खिचडा पार येथे शिजवलेल्या धान्याचे मिश्रण एका मातीच्या मडक्यात आणलेले असते साकीनंतर हा खिचडा श्रीमहाराजांकडून उधळला जातो.

8. भेटीचापार

उत्सवाच्या वेळी अश्विन शुध्द एकादशीस श्रीनागनाथ वायुरुपाने हेग्रस वंशजास भेट देतात. व भेटी नंतर हेग्रस वंशजाकडून साकी होते.

9. नरसोबापार

उत्सवाच्या वेळी याठिकाणी साकी म्हंटली जाते.

10. मशिद

उत्सवाच्या वेळी याठिकाणी साकी म्हंटली जाते.

11. मारुतीमंदिर

उत्सवाच्या वेळी याठिकाणी साकी म्हंटली जाते

12. नागनाथपार

उत्सवाच्या वेळी या ठिकाणी साकी म्हंटली जाते.

13. वेस

अश्विन शुध्द नवमीच्या उत्सवात श्री मार्कंडेय ऋषीयांच्या भेटीनंतर वेशीमध्ये ‘आगीनपवाडा’ होतो.(आगीनपवाडा म्हणजे धगधगत्या विस्तवावरुन पळत जाणे.)यावरुन श्रीमहाराज जातात.