किल्लारी
श्रीरघुनाथ हे काशीचे वे.शा.सं.ब्राम्हण फिरत फिरत श्रीक्षेत्रवडवाळ ह्या गांवी आले.वडवाळ येथे त्यांनी श्रीनागनाथांची सेवा केली व श्रीनागनाथांना ते गुरुमानू लागले. याच काळात मोहोळ येथील शंकरबुवालिंबाजी आंडगे हे वडवाळ येथे श्रींच्या दर्शनास येत असत. त्यांच्या भक्ती वर श्रीरघुनाथबुवा प्रसन्न झाले.तद्नंतर शंकरबुवा आंडगे यांनी संसार त्याग करून रघुनाथबुवांचे शिष्यत्व पत्करले व ते दोघे तेथेच राहू लागले.तद्नंतर रघुनाथबुवा फिरत फिरत किल्लारी येथे आपले शिष्यशंकरबुवास हीत आले.
किल्लारी येथे एका सत्पुरुषाची जीवंत समाधी आहे त्याजवळ राहू लागले. त्या सत्पुरुषांची कृपा दोघांनाही लाभली. त्या सत्परुषाच्या समाधी पासून चमत्कार होत होते.त्या शेजारी श्री नागनाथांचे मंदिर आहे.पूजेसाठी सरकारी दरबारातून जमिनी इनाम म्हणून मिळाल्या. येळवट, किल्लारी, अंबुलगह्या तीन गावातून जमिनी इनाम म्हणून मिळाल्या.मंदिराची पूजा श्री.आंडगे करू लागले. त्यांचे वास्तव्य त्याच मंदिरात कायम स्वरुपाचे होते.शंकरबुवा हे अध्यात्माचे थोर अभ्यासक होतं.ह्या रघुनाथ बुवानंतर शंकरबुवांचे घराणे सुरु झाले. ह्या ठिकाणी रघुनाथ बुवानंतर शंकरबुवा यांनी उत्सव मार्गशीर्ष शुद्धनवमी ह्या तिथीला सुरू केला.हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.शंकरबुवा अध्यात्मिक अधिकारी असल्याने ह्यांच्या नावेसुध्दा चैत्र शुद्धदशमीला उत्सव चालू आहे.ह्या मंदिरारत श्री वडवाळ सिद्धनागनाथांचे अभंग, आरती, साकी, चक्रीभजन म्हटले जाते.
श्री क्षेत्र मोहोळ येथे उत्सवा दरम्यान जे चक्रीभजन म्हटले जाते, ते श्रीरघुनाथबुवा यांनी रचलेले आहे.