देगांव

सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात मोहोळ पासून 14-15 मैल अंतरावर मोहोळ – बार्शी रोडवर श्री क्षेत्र देगांव (देवगांव) असुन तेथे अश्विन शुध्द अष्टमीस व दशमीस श्रीनागेशांचा मोठा उत्सव असतो. या गांवी श्रीनागनाथ येथे थांबले म्हणून या स्थानाला देवगांव असे नांव पडले.पुढे यांचे देगांव असे नांवपडले.
1.श्रीनागनाथमंदिर
गावाच्या मध्यभागी श्रीनागनाथांचे मंदिर असून.मंदिराच्या आवारात श्रीकाशीविश्वेश्वराचे मंदिर आहे. तसेच समोर दिपमाळ आहे.

2.महाव्दार
उत्सवाच्या वेळी याठिकाणी प्रमुख मानकज्यांच्या साक्या होऊन भाकणूक होते.

3.काळोबाकट्टा
उत्सवाच्या वेळी येथे साकी होते.

4.साकीस्थान (उखळ)
या ठिकाणी उत्सवाच्या वेळी साकी होऊन भाकणूक होते.

5.लिंबपार
उत्सवाच्या वेळी या ठिकाणी धनधान्याची भाकणूक होते.

6.भोगावतीनदी
उत्सवाच्या वेळी याठिकाणी साकी नंतर पावसा संदर्भात भाकणूक होते व येथून पुढे बोलेराम वंशजास भेट देण्यासाठी बोलेराम समाधीकडे जातात.

7.श्रीबोलेरामसमाधीवभेटीचेस्थान
श्री नागनाथ यांनी दिलेल्या वरा प्रमाणे प्रतिवर्षी अश्विन शुध्द अष्टमी व दशमीस श्रीनागेश वायुरुपाने बोलेराम वंशजास या ठिकाणी भेट देतात.
