नरंदे

बालपणापासून श्रीअज्ञानसिद्ध बरेच वर्षे वडवाळ येथे श्री नागनाथांची सेवा करीत राहात होते.आपला संप्रदाय श्री अज्ञानासिद्धकरवी वाढावा या हेतूने श्रीनागनाथांनी त्यांना दृष्टांतात सांगून हातकणंगले (जि. कोल्हापूर) ह्या तालुक्यातील आपला शिष्यआलमप्रभू यांच्या शेजारील ठिकाणी पाठविले. तेथे ते राहू लागले. श्रीनरेंद्रसिद्ध हे श्री अज्ञानसिद्धांचे धाकटे बंधू होत. त्यांच्या च नावा वरून त्या गावा ला’ नरंदे ‘हे नावपडले असावे.
                नरंदे गावा बाहेर सुमारे 2 मैलावर एक मोठे सुंदर असे बन होते. ह्या बनात श्री अज्ञानसिद्ध राहू लागले.पुढे त्यांना श्री नागनाथांच्या दर्शनाची उत्कंठा वाढली.त्यांनी चारही दिशेला श्रीनागनाथांना हाक मारली.तेंव्हा त्यांना चारही दिशेकडून ‘ओ’ असा प्रतिसाद ऐकू आला व शेवटी शरीरातून ‘ओ’ असा आवाज आला.तेंव्हा श्री अज्ञानसिध्दांनी समोर काही अंतरावर संजीवनी समाधी घेतली.या घटनेची साक्ष म्हणून चार दिशेला चार वमध्यभागी एक अशी पाच श्रीनागनाथांची मंदिरे एकाच आवारात आहेत. एका मंदिरातील पिंडस्वयंभू आहे. (याच ठिकाणी श्री अज्ञानसिध्दांना ह्रदयातून ‘ओ’ ऐकू आली होती.)ह्या मंदिरा भोवती तट बांधलेला आहे.समोर महाद्वार आहे.

ह्या मंदिरा समोरच श्रीअज्ञानसिद्धांनी संजीवनी समाधी घेतलेले स्थान आहे.ह्या समाधीत खाली उतरण्याची सोय आहे.खाली समाधीचे द्वारबंद आहे.ह्या समाधी मंदिरामागे भागीरथी नामकतीर्थ आहे.तीर्थाच्या काठावर श्रीसप्तकोटेशाचे स्थान आहे.ह्याच आवारात श्रीअज्ञानसिद्धांचे शिष्य श्रीदत्तचैतन्ययांची समाधी बांधलीआहे.हे श्रीअज्ञानसिध्दांचे समकालीन होत. त्यांनीच श्रीअज्ञानसिध्दांची समाधी बांधली आहे.एकंदरीत हा परिसर अगदी रम्य मन प्रसन्न करणारा आहे.श्रीअज्ञानसिध्द यांचे बंधू श्रीविदेहसिध्द यांची समाधी मंदिरासमोर पहावयासमिळते. गावात श्री नागनाथाचे मंदिरआहे. या ठिकाणचा उत्सव म्हणजे श्रीअज्ञानसिद्धांचा समाधी काल होय. तो दिवस म्हणजे माघ शुद्धपंचमी.सलग2-3 दिवस हा उत्वस तेथील भक्त व श्रीअज्ञानसिद्धांच्या घराण्यातील वंशज श्रीबुवा हे प्रतिवर्षी अत्यानंदाने साजरा करतात. अलीकडे मार्गशीर्ष शुद्धनवमीस संकटहरणीचा दिवस साजरा करतात. उत्सवासाठी कोल्हापूर दरबारातून वर्षासन आजापावेतो येते. येथील भक्तमंडळी भाविक आहेत.