श्री पिलाजी पाठक
तिमण्णा धनगर नावाच्या भक्ताचा उध्दार करीत इतरही अनेक जणांच्या उध्दाराचे कार्य करीत श्रीनागनाथ महाराष्ट्रात आले.मार्ग चालीत असता हल्लीच्या पुणे पंचक्रोशीतील केंदूर या गावी आले.तेथे शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन शाखेचे पाठक या ब्राम्हण घराण्यातील श्रीपिलाजी पाठक यांची भेट झाली.पुर्व सुकृतानुसार श्रीपिलाजीयांचा भाग्यरवी उदयाला आला होता.त्यामुळेच श्रीनागेशांची व यांची भेट झाली.केंदूर गावी श्री पिलाजी यांच्यासाठी श्रीनागेशांनी कांही काळ वास्तव्य केले.
श्रीपिलाजी हे शिव उपासक होते. धर्मानुसार आचरण वेद शास्त्रात पारंगत व सतत शिवध्यानात रत असलेल्या पिलाजींच्या सेवेवर प्रसन्न होऊन श्रीनागेशांनी त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेऊन त्यांना मंत्रोपदेश दिला, त्यांना निजानंदाच्या सुखात नेऊन ठेवले. श्री पिलाजीसह त्यांनी आसपासच्या भागात काही लीला केल्या
उदा.
1. पाबळ
2. कान्हूरमेसाई
3. निमगांव(खंडोबाचे) त्यातील ही प्रामख्याने तीन स्थाने होत.
श्रीनागेशांना पुढे अनेक ठिकाणी जाऊन आपले विहित कार्य करावयाचे असल्याने त्यांनी श्री पिलाजी यांना,’ तुझ्या पोटी जो मुलगा जन्म घेईल तो माझाच भक्त होणार आहे व त्याच्या पोटी माझ्याच अंशाने एक सत्पुरुष जन्मास येईल त्याला मीच अनुग्रह देणार आहे’ असा आशीर्वाद दिला व पुढे मार्गस्थ झाले.