वरदम्मा

                एकलिंग तेली बरोबर जात असताना वरदम्मा आपल्या नातेवाईकांना म्हणाली की, ‘पूर्वी माझा व तुमचा संबंध होता पण आता तो संपलेला आहे.’या पुढे मी गुरूंची उपसाना (आचार्योपासना) करीन. असा आपला मनोभाव तिने स्पष्ट शब्दात व्यक्त केला.श्रीनागनाथांकडे जाऊन तिने अत्यंत मनोभावे दर्शन घेतले व त्यांच्या सेवेत ती रममाण झाली.ह्या प्रकारामुळे गावात लोकांमध्ये प्रतिकूल स्वरूपाची चर्चा सुरू झाली व बाहेरच्या साधु पुरूषांना पाचारण करून आपण ह्या बाबतीत खरे सत्य जाणून घेतले पाहिजे, असा निर्धार गावकज्यांनी केला.मुस्लिम साधु व सर्व संत श्रीनागनाथांच्याकडून घडलेला प्रसंग समजावून घेण्यास असमर्थ ठरले.
गावक-यांच्या चर्चेला आणखी एक खाद्य मिळाले व ते म्हणजे वरदम्माचे पोट गरोदर स्त्री प्रमाणे दिसू लागले. ह्या गोष्टीचा छडा लावण्यासाठी ग्रामस्थांनी श्रीनवनाथांना खास बोलावून घेतले व ते येत आहेत असे जेंव्हा एकलिंग तेलीने आपल्या गुरूंना कळविले त्यावेळी एकलिंग तेली भिंतबांधण्याचे कामकरण्यात गर्क झाला होता. श्रीनागनाथांच्या आदेशानुसार एकलिंग तेली त्यांना भिंतीवर बसून सामोरा गेला व वाघ व सिंह इत्यादी वाहनांच्यावर बसून आलेल्या त्या नवनाथांना जेंव्हा एकलिंग तेली असा सामोरा गेला तेंव्हा ते आश्चर्यचकित झाले व शिष्याचा जर एवढा पराक्रम आहे. (अध्यात्मिक क्षेत्रातील प्रगती) तर गुरू केवढे पराक्रमी (थोर) असतील. श्री एकलिंग तेली हे नवनाथांना श्रीनागनाथांच्या भेटीला घेऊन गेले व तेथे वरदम्मेचे दर्शन सर्वांनाझाले.श्रीनागनाथांनी तिला हाक मारली व तिने सर्वांना नमस्कार केला.गुरू आज्ञेवरून तिने सर्व वस्त्रे दूर टाकून दिली व ती नग्नावस्थेत उभी राहिली, तेंव्हा तिचे लिंग परिवर्तन झाले असल्याचे श्री नवनाथांच्या लक्षात आले.
               अघटीत नवलाहो जाहले । नारी नसोनी नर दिसले ।
               सकळ विस्मयात घडले । धन्य धन्य नागनाथ ॥
वरदम्मेचें रूपांतर झाल्यावर त्या पुरूषाने वरदबसवराज हे नामांतर धारण केले व हे नांव ठेवण्याची किमया श्री नवनाथांनी केली असेही या संदर्भात मानले जाते व हा बसवराज श्रीनागनाथांचा एकनिष्ठ भक्त होऊन राहिला असे दिसते.
               नवनाथ असमासी संतोषिले । वरदबसव नामचि ठेवले।
              वदरम्मा नामचि पालटले । वरद बसवराज नामाभिधान ॥
असे अनेक चमत्कार त्यांच्या हातून घडत गेले. मानूर येथे ही श्रीनागनाथांचा उत्सव प्रतिवर्षी अश्विन महिन्यात साजरा केला जातो. श्रींचा प्रवास पुढे सुरू झाला व ते देगांवी (वा.ता.मोहोळ) थांबले.