पाबळ
ह्या ठिकाणी श्रीकान्हुराज यांनी आपणाला सापडलेल्या तीन बाणांपैकी एका बाणाची स्थापना करुन तेथे श्रीनागेश्वरनावाचे भव्य मंदिर उभे केले आहे. त्यां मंदिरा समोर एक मोठे तीर्थ आहे.त्याला पाबळेश्वरतीर्थ म्हणतात. हे स्थान ही कान्हुराज यांनीच तयार केलेली असावीत. या मंदिराभोवती नीटपणे पाहिलेले असता ह्या मंदिरा खाली अजुनही बांधकाम असावे असे स्पष्ट वाटते. त्या बांधकामाचे अवशेष आजही दिसतात. गावातील वृध्दलोक आजही सांगतातकी, ह्या नागेश्वर मंदिराखाली अजुन दोन मंदिरे आहेत. असे आम्ही पुर्वजांकडून ऐकतो. नागेश्वर मंदिराखाली पाबळेश्वर मंदिर व त्याखाली पाताळेश्वर असे दोन मंदिरे आहेत. श्रीनागेश्वर मंदिराखालून भूयार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरित हे ऐतिहासिक स्वरुपाचे, संशोधकांना चालना देणारे, असे प्राचीन सुमारे आठशे ते नऊशे वर्षापुर्वीचे शिवमंदिर आहे.बांधकाम जुने आहे.ह्या मंदिरातील श्रीगणेशाची मुर्तीही अतिप्राचीन आहे.


कन्हेरसर :-
हे स्थान पाबळ पासून 7-8 कि.मी.अंतरा वर आहे.श्रीकान्होपाठक यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन माहूरगडावरची रेणूकादेवी येथ पर्यंत ह्यांच्या बरोबर आली. कान्होबांना घातलेली अटत्यांनी मोडल्याने ती तेथेच थांबली. श्रीकान्होबांनी विनंती केल्यावरही ती पुढे आली नाही.ह्याच ठिकाणी भव्य असे मंदिर उभारलेले आहे.मंदिर भव्य असून नक्षीकाम सुंदर आहे.ह्या ठिकाणी एक आड आहे.ह्याआडाच्या पाण्याने अनेकांचे रोगनाहीसे झाले व होतात, अशी श्रध्दा आहे. ही देवी भक्तांच्या हाकेला धावून येते, भक्तांचे मनोरथ पुर्ण करते असे प्रत्ययास येते.