जाजन मुगळी

हे स्थान कर्नाटकातील बीदर जिल्ह्यात आहे. श्री नागेशभक्त श्री आलमखान पठाण यांची येथे समाधी आहे.या स्थानाचे पुजारी श्री.पाठकमंडळी आहेत. येथे श्री नागेश सांप्रदायिक पारंपारिक भजने म्हटली जातात. श्री आलमखान यांनी वेदांतपर-स्तुतिपर अनेक अभंग केलेले आहेत. जेवढे उपलब्ध झाले तेवढे नागेशदर्पण ग्रंथात छापलेले आहेत.
               श्री नागेशशिष्य श्री अज्ञानसिद्ध यांना गुरूमानणा-या कांही शिष्यांनी आपल्या उपासने साठी निर्मिलेली स्थानेही श्री नागेशांची स्मृतिस्थाने म्हणून प्रसिद्ध होत.