केंदुर

हे स्थान पुणे जिल्ह्यातील पुणे – नगर रोडवर शिरुर या तालुक्यात साधारण पुणेपासुन 40-45 कि.मी.अंतरा वर आहे.श्रीनागेश संप्रदायाच्या आधारे श्रीनागेश व भक्त हेग्रस हे दोघेही मानस सरोवराहून मोहोळ (चंद्रमौळी) या गांवी जाताना वाटेत या केंदूर गावात श्री. पिलाजीपाठक यांच्यासाठी थांबले. एकंदरीत चरित्र पाहता, श्रीनागेशांचा येथे काही काळ मुक्काम असावा असे दिसते. श्री.पिलाजी यांच्या सेवेवर संतुष्ट होऊन ह्या गावी श्रीनागेशांनी पिलाजींच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्यांना स्वानंदात ठेवले.ह्या केंदूर च्या आसपास पाबळ, कान्हूरमेसाई, निंमगांव (खंडोबाचे) या ठिकाणी त्यांच्या हातुन कांही लीला घडल्या. काळाच्या ओघात त्या लीलांचा उल्लेख पुसला गेला असावा. पुढे अनेकांचे उध्दार कार्य व्हावयाचे असल्याने त्यांचा प्रवास पुढे सुरु झाला. त्यांच्या हातुन कांही स्थानांची निर्मिती झाली आहे.
               1. भागीरथी 2. पिंपळ खोरी व 3.वेळा नदी काठा वरील पाण्याचा झरा. (नदी काठील स्थान इह लोक सोडल्यावर तयार झाले आहे.) त्याच बरोबर या गावात केंद्राई देवीचे व काही योगी सत्पुरुषांची स्थाने आहेत.