निमगांव

हे गांव खंडोबाचे निमगांव म्हणुन प्रसिध्द आहे. ह्या ठिकाणीही श्रीनागेशांच्या हातून लीला घडल्या आहेत. त्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीकान्होराजांनी श्रीनागेश्वर मंदिर म्हणून निर्मिले आहे. हे मंदिर किल्ल्या शेजारी भिमा नदीच्या काठावर आहे.ह्या मंदिरातील बाण इतर दोन मंदिरातील बाणांच्या मानाने लहान आहे.मंदिराच्या बांधकामाकडे पाहता निश्चितच हे मंदिर आठशे ते नऊशे वर्षांपुर्वीचे असावे असे सहजपणे अनुमान काढता येते. पाबळ मंदिरातील श्रीगणेशाची मुर्ती व ह्या मंदिराबाहेरील श्रीगणेशाचीमूर्ती धाटणीने सारखीच आहे.फक्त येथील मूर्ती आकाराने लहान आहे.हे स्थान नदीच्या काठी असून रमणीयआहे.