वरद नागेश मध्ये आपले स्वागत

ध्यानेन्नागेश देवं सतत सुर गणासे वितामन्तमनाद्घं
व्यक्ता व्यक्त स्वरुपंज निलरहि तंनिर्विकल्पमलक्षम्|
तत्वज्ञानं समस्तं निखिल भय हरंभूर्ल्लो के विनाशं
व्दन्व्दातीतं शरण्यं निखिल सुखकरं भक्ति कल्मद्रुमंतम् ||

महाराष्ट्रात अनेक संप्रदाय इतिहास कालापासून आपले तत्वज्ञान आणि आचार प्रणाली दृढ करीत आले आहेत. नाथ, महानुभव, वारकरी, दत्त, विरशैव, गणेश इ. अनेक संप्रदायांच्या अनुयायांनी मराठी वाड्मयाची फार मोठी सेवा केलेली आहे. या सर्व संप्रदायामध्ये ‘नागेशसंप्रदाय’ हा देखील अत्यंत महत्वाचा संप्रदाय आहे. इतर संप्रदाया प्रमाणे नागेश संप्रदायाला देखील महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतीक जीवनात वैशिष्ठ्यपूर्णस्थान आहे. श्री संत अज्ञानसिद्धा दिसंतांनी घालून दिलेली उपासना पद्धतीयाला ‘ नागेशसंप्रदाय ‘ म्हणतात व याचे अनुकरण करणाज्यांना ‘ नागेशसांप्रदायिक ‘ म्हणतात.

 

नागेशसंप्रदाय :एकस्वतंत्रसंप्रदाय –

नागेश संप्रदाय हा एक स्वतंत्र संप्रदाय आहे असे या संप्रदायातील अज्ञानसिद्धादि अनेक कवींची भूमिका आहे. आपल्या ‘ वरदनागेश’ या ग्रंथात अज्ञानसिद्ध म्हणतात.

मग चरणावरुन उठविला ।स्वस्थानबैसविला ।
उपदेशक्रमदाविला ।विधियुक्तमार्ग । 1॥23॥
वरद नागेश आपुली संप्रदायाची विधी ।करुनि स्थिरावला सुखसमाधी ।
तेथे अज्ञान शक्तीचा बुध्दी ।नास्तिजाहल्या । 1॥24॥

या वरुन नागेश संप्रदाय हा एक स्वतंत्र संप्रदाय आहे हे सिद्ध होते. या शिवाय निंबतीर्थ, गंगातीर्थ, पितृतीर्थ, चंद्रतीर्थ, आणि खर्गतीर्थ अशी या संप्रदायाची स्वतंत्र तीर्थस्थाने आहेत. या तीर्थस्थानांशी अन्यसंप्रदायांचा कांहीसंबंध नाही. मानूर, देवगांव, मोहोळ, वडवाळ, मार्डी, ही नागेशांची स्मृतिस्थाने असून ती संप्रदाय मान्य आहेत. या स्थानांशी इतर संप्रदायांचा कांही संबंध नाही. तसेच महागाव, किल्लारी, वरवंड, केंदुर, पाबळ, कान्हूरमेसाई, निमगाव (खंडोबा ), कन्हेरसरजि. पुणे, नरंदेही नागेश शिष्य अज्ञानसिद्धांची स्मृती स्थाने होत. तसेच जाजनमुगळी हे नागेशशिष्य आलमखान यांचे स्थान होय. आळते. (ता. हातकणंगलेजि. कोल्हापूर) हे नागेशशिष्य आलमप्रभू यांचे स्थान होय. या स्थानांशी इतर संप्रदायांचा कांहीही संबध नाही. इतर संप्रदायात भजन करणाज्या लोकांना भजनकरी, टाळकरी इ. संज्ञानी संबोधिले जाते, परंतु नागेश संप्रदायात मात्र भजन करणाज्या प्रत्येक माणसाला’ संत ‘हे बिरुद दिले जाते. या वरुन या संप्रदायाचे वेगळेपणा सहज सिद्ध होते. या शिवाय अभंग, पदे, साकी, फाकी, आरती, स्तोत्रे इ. विपुल वाड्.मय नागेशसांप्रदायिकांनी निर्मिले आहे.नागेश संप्रदायाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा हा भक्कम पुरावा होय.